म. गं. नातू - लेख सूची

वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार

प्रस्तुत लेखात कै. दा.म. जोशी यांच्या कादंबर्‍यांच्या साह्याने त्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाचा आलेख काढण्याचे योजिले आहे. तात्त्विक कादंबर्‍यांचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकाच्या कादंबर्‍यांत त्याच्या तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले असेल असे मानणे गैर ठरू नये. जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा काल १९१५ ते १९.३० असा वीस वर्षांचा आहे. या अवधीत त्यांनी एकूण पाच कादंबर्‍या लिहिल्या. या पाचही कादंबर्‍यांचा विषय …

कै.वा.म. जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने

२१ जानेवारी १९८२. बरोबर १०० वर्षापूर्वी याच दिवशी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी वामन मल्हार जोशी ह्यांच्या रूपाने सौजन्य मूर्त झाले. थोर तत्त्वज्ञ, युगप्रवर्तक कादंबरीकार, निस्सीम सत्योपासक, वाचकांना विचार करावयास शिकविणारे समर्थ अध्यापक, इत्यादी अनेक नात्यांनी वा. म. जोशी आपल्याला परिचित आहेत. परंतु महाराष्ट्रास सर्वाधिक प्रभावित केले ते त्यांच्या सौजन्याने. सौजन्य हा त्यांच्या आचाराचा, विचाराचा, …